मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहायक नवलसिंगराजे पाटील यांचा कलाली येथे सत्कार

बातमी शेअर करा...

मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहायक नवलसिंगराजे पाटील यांचा कलाली येथे सत्कार

 

अमळनेर: महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहायक नवलसिंगराजे पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील कलाली गावाला भेट दिली. यावेळी गावातील नवयुवक मंडळाने त्यांचे स्वागत करून सत्कार केला.

नवलसिंगराजे पाटील यांच्या भेटीमुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी अनेक युवक आणि गावकरी उपस्थित होते. त्यांनी पाटील यांचे स्वागत केले आणि गावातील विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम