मंदिरात चोरी करणारे दोघे अटकेत!

भडगाव पोलिसांची धडक कारवाई ;

बातमी शेअर करा...

मंदिरात चोरी करणारे दोघे अटकेत!

भडगाव पोलिसांची धडक कारवाई

भडगाव प्रतिनिधी

तालुक्यातील कजगाव परिसरात दोन वेगवेगळ्या मंदिरांत चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना भडगाव पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त माहिती, सततची पाळत आणि प्रभावी तपासाच्या जोरावर केवळ काही दिवसांतच पोलिसांनी चोरीचा छडा लावत आरोपींना गजाआड केले. त्यांच्या ताब्यातून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, उर्वरित मालाचा शोध सुरू आहे.

२३ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ३.०० ते ४.३० वाजेच्या दरम्यान कजगाव रेल्वे पुलाजवळील महादेव मंदिरात चोरी झाली. चोरट्यांनी पंचधातूचे वस्त्र (१५,००० रु.), पंचधातूचा नाग (५,००० रु.) आणि पंचधातूचे त्रिशूल (५,००० रु.) असा एकूण २५,००० रुपयांचा ऐवज लंपास केला.

२० मार्च २०२५ रोजी रात्री ११.०० ते २१ मार्चच्या पहाटे ५.३० वाजेदरम्यान भास्कर नगर येथील महादेव मंदिरात चोरी झाली. यात ५,००० रुपये रोख व ३,००० रुपयांचा एम्प्लिफायर असा ८,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

या गंभीर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव पोलिसांनी विशेष तपास पथक तयार केले.

गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आफिक शेख शरिफ मेहतर उर्फ कैन्टी (रा. कजगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली व त्याचा साथीदार मिथुनसिंग मायासिंग बावरी (रा. कजगाव) याच्यासह गुन्हा केल्याचे उघड झाले.

आरोपींकडून ३,००० रुपये रोख आणि ३,००० रुपयांचा एम्प्लिफायर जप्त करण्यात आला आहे. पंचधातूचे वस्त्र, नाग व त्रिशूल हे त्यांनी विक्री केल्याचे समोर आले असून, त्याचा शोध सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम