भारतात मतदानाची सक्ती असायला हवी – माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर”
भारतात मतदानाची सक्ती असायला हवी – माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर”
भुसावळ / प्रतिनिधी
भारतात मतदानाची सक्ती असायला हवी,लोकशाही व्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी समाजातील उच्चशिक्षित, चारित्र्यसंपन्न व सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या नागरिकांनी राजकीय क्षेत्रात यायला हवे, तरच उद्याच्या प्रगल्भ राजकीय लोकशाहीचे स्वप्न साकार होइल.
राजकीय क्षेत्र हे समाज सेवेचे साधन आहे. अलीकडच्या काळात सत्ता आणि सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता, हे जे काही उद्योग चाललेले आहेत ते भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहेत. मतदानाची सक्ती आवश्यक आहे.
त्यासाठी भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना दिलेला मतदानाचा अधिकार आपण निर्भीडपणे, विचारपूर्वक पूर्ण करायला हवा, कारण तो भारतीय लोकशाहीचा श्वास आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदान करून सहभागी होणं हे आदर्श भारतीय नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे” असे प्रतिपादन माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी केले.
सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने एका विशेष चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात ते बोलत होते. “बलशाली भारतासाठी लोकशाहीची आवश्यकता” हा विषय घेऊन या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जतीन कुमार मेढे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे होते .माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर पुढे म्हणाले की ,भारतीय लोकशाही ही जगामध्ये प्रसिद्ध आहे. परंतु भारतीय लोकशाहीत मतदान हे सक्तीचे करावे ही भूमिका घेऊन आपण समाजासमोर आलो पाहिजे. याकरिता एखादी चळवळ उभी राहिला पाहिजे. मतदानाची सक्ती राजकारणातील शुद्धीकरण ही अलीकडच्या काळातील गरज आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी भारतीय लोकशाही कडे त्या दृष्टीने पहावे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.सुनील नेवे यांनी केले. या चर्चासत्रातून उद्याचा भारताचा आदर्श नागरिक घडावा या चर्चा सत्रातून जे विषय चर्चेला आले त्यातून समाज प्रबोधन व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले अशी भूमिका प्रा. डॉ.सुनील नेवे यांनी मांडली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे हे होते. प्रा डॉ किशोर कोल्हे यांनी लोकशाहीच्या विकासासाठी तरुणांनी पुढे यावे सामाजिक कार्यामध्ये रस घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा कल्पना निकम नाशिक यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा. मुकेश चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाला डॉ.किरण चौधरी, डॉ. जतीन मेढे, डॉ. दिनेश पाटील, डॉ.दिगंबर खोब्रागडे, डॉ.दिनेश महाजन, डॉ. आशुतोष वर्डीकर, प्रा.हेमंत इंगळे, डॉ. गणेश चौधरी, डॉ. मीनाक्षी वाघुळदे, प्रा पद्माकर सावळे, प्रा. गीतांजली चौधरी, प्रा.फाल्गुनी राणे, प्रा.भावना प्रजापती यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम