मतदान जागृतीसाठी रिल्स बनवा आणि बक्षिसे जिंका

बातमी शेअर करा...

मतदान जागृतीसाठी रिल्स बनवा आणि बक्षिसे जिंका

मतदारांमध्ये जनजागृती वाढवण्यासाठी मनपा प्रशासनाची रील मेकिंग स्पर्धा

जळगाव प्रतिनिधी शहरातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि तरुणाईचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने “विकासासाठी मतदान नक्की करा” हा संदेश घराघरात पोहोचवण्याच्या उद्देशाने रील मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडणाऱ्या या उपक्रमाला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या स्पर्धेत मतदान जनजागृतीवर आधारित उत्कृष्ट रिल्स तयार करणाऱ्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम पारितोषिक म्हणून ३ हजार रुपये रोख, तर द्वितीय पारितोषिक म्हणून २ हजार रुपये रोख देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी काही नियमावली जाहीर करण्यात आली असून त्याचे उल्लंघन झाल्यास संबंधित रील अपात्र ठरवण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकाचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून तो संबंधित शहराचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. रील पोस्ट करताना महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट @jome_digital (जसे घोषित आहे) ला टॅग करणे अनिवार्य राहणार आहे. मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील नागरिकांची भूमिका आणि मतदान करण्याचे आवाहन या बाबी रीलमध्ये प्रभावीपणे मांडणे अपेक्षित आहे.

मतदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे आणि विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साह वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असून नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम