मदन लाठी यांना खान्देश रत्न पुरस्कार प्रदान

खान्देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 27 व्यक्तिमत्त्वांना खान्देश रत्न

बातमी शेअर करा...

मदन लाठी यांना खान्देश रत्न पुरस्कार प्रदान

खान्देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 27 व्यक्तिमत्त्वांना खान्देश रत्न

जळगाव I प्रतिनिधी

आरंभ मराठी चॅनल तर्फे दिनांक 5 जानेवारी रोजी खानदेशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 27 व्यक्तिमत्त्वांना खानदेश रत्न 2025 पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेत्यात श्रीमदन रामनाथ लाठी हे मूळचे भोकर निवासी असून त्यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे सामाजिक कार्यामध्ये त्यांचा रक्तदानात सिंहाचा वाटा आहे आतापर्यंत त्यांनी 90 वेळेस रक्तदान केलेले आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२० मध्ये प्लाझ्मा देऊन चार रुग्णांना जीवदान मिळालेले आहे.

त्यांनी आतापर्यंत विविध राष्ट्रीय दिवशी आणि माजी राष्ट्रपती आणि आताचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी सरांचा वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे १७ सप्टेंबर २०२४ रोजी रक्तदान केले आहे. या बरोबर ते गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी असुन स्वच्छ अभियान, प्लास्टिक बंदी आदींवर दोन वर्षांपासून जनजागृती करीत आहेत

या बरोबर ते जिल्हा ऑयकाॅन असुन २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदान जनजागृती केलेली आहे. ती प्रभावी केल्याबद्दल त्यांचा सत्कार जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हस्ते सत्कार केला असुन राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या कार्याचे काही क्षण त्याच्या फेसबुक आणि ट्विटर अपलोड केले आहे. मदन लाठींचा आतापर्यंत विविध संस्थांतर्फे सत्कार करण्यात आलेला आहे.

या सर्व उपक्रमाबद्दल आरंभ मराठी चॅनल तर्फे मराठी सिनेअभिनेत्री अनिता दाते केळकर, जळगाव येथील आमदार श्री सुरेश भोळे, उद्योजक रविंद्र लढ्ढा, डॉ निलेश चांडक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे या प्रसंगीकज कासार, आरंभ मराठी चॅनलचे संचालक आशुतोष पंड्या आणि त्यांची टिमचे सदस्य उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम