मध्यरात्री पोलिसांसोबत अरेरावी करणाऱ्यांवर कारवाई

बातमी शेअर करा...

मध्यरात्री पोलिसांसोबत अरेरावी करणाऱ्यांवर कारवाई

जळगाव : रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या तरुणांची चौकशी केली. परंतु ते तरुण पोलिसांसोबत अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याचा प्रकार दि. १२ रोजी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात घडला. बहाकरणी दोघांविरुद्ध शहर पोलिसात

गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी सफी

प्रणीत रणित, पोलेकों चंद्रकांत सोनवणे, आनंद राठोड, महेंद्र गायकवाड हे दि. १२ रोजी रात्रीच्या सुमारास गस्तीवर होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ते रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालीत असतांना त्यांना हर्षल दिलीप चौधरी व योगेश उर्फ पप्पू शर्मा (दोघ, रा. अयोध्या नगर) हे संशयास्पदरित्या फिरत होते. त्यांना चौकशीसाठी थांयवले असता ते पोलिसांसोचत ऐकरी भाषेत बोलू लागले.

तसेच चौकशीवेळी ते तुम्हाला काय गरज तुम्ही तुमची ड्युटी करा ना, आम्हाला टोकण्याचा विचारपूस करण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे असे म्हणाले, यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी त्यांची समजवून सांगत होते, मात्र ते तरी देखील ऐकण्याच्या मनस्थिीत नसल्याने त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम