
मनपाच्या प्रारूप प्रभाग रचनेवर १४ हरकती
मनपाच्या प्रारूप प्रभाग रचनेवर १४ हरकती
जळगाव : महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर बुधवारी दि. १० रोजी १४ हरकती दाखल झाल्या असून आतापर्यंत एकुण ३३ हरकती दाखल झालेल्या आहेत.
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली असून या प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी ५, दुसऱ्या दिवशी निरंक, तिसऱ्या दिवशी३ तर, चौर्थ्या दिवशी ३ व त्यानंतर मंगळवारी ८ हरकती आल्या होत्या. यानंतर बुधवारी पुन्हा १४ जणांनी शहरातील विविध प्रभागांच्या रचनेवर हरकती नोंदविण्याल्या असून नव्याने केलेल्या प्रभाग रचनेत दुरुस्ती सुचवलेली आहे. दि. १५ पर्यंत हरकती स्विकारल्या जाणार असून त्यानंतर जिल्हाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडून सुनावणी घेण्यात येणार आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम