
मनपाच्या भरती प्रक्रियेसाठी अद्यावत बिंदूनामावली पाठविण्याचे निर्देश
मनपाच्या भरती प्रक्रियेसाठी अद्यावत बिंदूनामावली पाठविण्याचे निर्देश
जळगाव – शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी शासनाने आकृतीबंध व भरतीचे नियम मंजूर केले आहेत. मात्र या भरतीसाठी विभागीय आयुक्तांकडून बिंदूनामावली अंतिम करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु हा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त झालेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त कुंदन हिरे यांनी महापालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठविले आहे. यात त्यांनी नमूद केले आहे की, सरळ सेवा संवर्गाचा शासन निर्णयानुसार बिंदूनामावली नोंदवही अद्यावत करून ती विहीत नमुन्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे संलग्न करून परिपूर्ण प्रस्तावासह माहितीगार कर्मचारी विभागीय आयुक्त कार्यालयात त्वरीत पाठवावा, असे निर्देश या पत्रातून देण्यात आले आहेत

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम