
मनपाच्या महसुल विभागासमोर २१ कोटींच्या वसुलीचं मोठं आव्हान
तीन दिवसांत पूर्ण करावं लागणार लक्ष्य
मनपाच्या महसुल विभागासमोर २१ कोटींच्या वसुलीचं मोठं आव्हान
तीन दिवसांत पूर्ण करावं लागणार लक्ष्य!
जळगाव : मार्च महिना संपण्यास अवघे तीनच दिवस शिल्लक असताना जळगाव महापालिकेपुढे २१ कोटी रुपयांच्या करवसुलीचं आव्हान उभं ठाकलं आहे. गेल्या वर्षी महसुल विभागाने ११२ कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली होती. मात्र, यंदा आतापर्यंत केवळ ९१ कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे.
शनिवार आणि रविवार सुट्या असूनही महसुल विभागाचे कर्मचारी वसुलीसाठी मैदानात उतरले आहेत. कर न भरणाऱ्या मालमत्ताधारकांवर कारवाई करत त्यांच्यावर थेट बोजा चढवण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेने लोक अदालत मार्फत ४,५०० थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यात ३०१ थकबाकीदारांनी एकूण १ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी भरली. मात्र उर्वरित ४,२०० हून अधिक थकबाकीदारांनी अजूनही कर भरणा केलेला नाही.
एमआयडीसीतील उद्योजकांकडेही मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम अजूनही थकीत आहे.
महसुल वसुलीला गती देण्यासाठी उपायुक्त धनश्री शिंदे, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे आणि सुमित जाधव हे स्वतः वसुली पथकासह रस्त्यावर उतरले आहेत. तीन दिवसांत २१ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्याचं कठीण आव्हान महसुल विभागासमोर आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम