मनपाच्या मार्केटमध्ये सोमवारपासून स्वच्छता मोहीम

बातमी शेअर करा...

मनपाच्या मार्केटमध्ये सोमवारपासून स्वच्छता मोहीम

जळगाव : पावसाळ्यापूर्वी शहरात स्वच्छतेचे

वातावरण निर्माण करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने कंबर कसली आहे. शहरातील सर्व प्रमुख महानगरपालिका व्यापारी संकुलांमध्ये येत्या सोमवारपासून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील १८ महत्त्वाच्या व्यापारी संकुलांमध्ये युध्दपातळीवर स्वच्छता केली जाईल, असे आदेश सहाय्यक आयुक्त उदय मधुकर पाटील यांनी दिले आहेत.

या मोहिमेची सुरुवात १६ जून रोजी जुने बी. जे. मार्केट, महात्मा गांधी मार्केट, डॉ. आंबेडकर मार्केट, नानीबाई व्यापारी संकुल, वालेचा व्यापारी संकुल, सोमाणी मार्केट (पिंप्राळा), मीनाताई ठाकरे मार्केट आणि गेंदालाल मिल येथून होईल. त्यानंतर १७ आणि १८ जून रोजी उर्वरित प्रमुख बाजारपेठांमध्ये स्वच्छता अभियान राबवले जाईल. यात नवीन बी.जे. मार्केट, शामा प्रसाद मुखर्जी उद्यान मार्केट, भास्कर मार्केट, भोईटे मार्केट, धर्मशाळा, सेंट्रल/फुले मार्केट, नवीन शाहू मार्केट, जुने शाहू मार्केट आणि रामलाल चोबे मार्केट यांचा समावेश आहे. १९ जून रोजी गोलाणी मार्केट (तळमजला) येथे स्वच्छता करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम