मनपात अॅडव्हान्स कर भरण्याची मुदत १५ मेपर्यंत वाढवली

१६ हजारांहून अधिक नागरिकांचा प्रतिसाद; तब्बल ९५ लाखांची सवलत वितरित

बातमी शेअर करा...

मनपात अॅडव्हान्स कर भरण्याची मुदत १५ मेपर्यंत वाढवली
१६ हजारांहून अधिक नागरिकांचा प्रतिसाद; तब्बल ९५ लाखांची सवलत वितरित

जळगाव : जळगाव महानगरपालिकेने मालमत्ता व पाणीपट्टी अॅडव्हान्स कर भरणाऱ्या नागरिकांसाठी सवलतीच्या योजनेला १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. एप्रिल महिन्यात कर भरणाऱ्यांना १० टक्के (तर महिला मालमत्ताधारकांना १५ टक्के) सवलत देण्यात येत आहे. या सवलतीमुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून केवळ ८ दिवसांत तब्बल १६,७८७ मालमत्ताधारकांनी आपला कर भरला आहे.

दि. २१ ते ३० एप्रिल या कालावधीत महापालिकेच्या तिजोरीत ११ कोटी ९७ लाख रुपयांचा भरणा झाला. यामुळे महापालिकेने संबंधित नागरिकांना सवलतीच्या स्वरूपात एकूण ९५ लाख रुपयांहून अधिक रक्कम सवलत म्हणून वितरित केली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिलमध्ये कर भरणाऱ्यांना सवलतीचा लाभ दिला जात आहे. यावर्षी नागरिकांना अधिक सवलत मिळावी यासाठी मनपाने सवलत योजनेची मुदत १५ मेपर्यंत वाढवली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम