मनपाने गोलाणी मार्केटमधील चार दुकाने केली सील

महापालिकेच्या मार्केट वसुली विभागाच्या पथकाने केली कारवाई

बातमी शेअर करा...

मनपाने गोलाणी मार्केटमधील चार दुकाने केली सील

महापालिकेच्या मार्केट वसुली विभागाच्या पथकाने केली कारवाई

जळगाव :अनेक दुकानदारांकडून थकबाकी भरली जात नसल्यामुळे शहरातील गोलाणी मार्केटमधील चार दुकानदारांची दुकाने शुक्रवारी सील करण्याची कारवाई महापालिकेच्या मार्केट वसुली विभागाच्या पथकाने केली.

जळगाव शहरातील गोलाणी मार्केटसह विविध मार्केटमधील दुकानदारांकडे मोठ्याप्रमाणात थकबाकी थकीत आहे. सदर दुकानदारांना वारंवार आवाहन करून देखील त्यांच्याकडून थकबाकीचा भरणार केला जात नसल्यामुळे महापालिकेच्या मार्केट वसुली विभागाकडून

गोलाणी मार्केटमधील व्यापारी प्रवीण जैन व सीताराम सोनी यांच्यासह चार दुकाने सील करण्याची करवाई करण्यात आली. सील केलेल्या दुकानदारांकडे १ लाख २० हजार रुपयांची थकबाकी थकीत होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून उद्या व पर्वा देखील वसुलीची कारवाई सुरु राहणार आहे. मनपाच्या महसुल विभागाच्या उपायुक्त धनश्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट वसुली विभागाचे अधीक्षक गौरव सपकाळे, संजय दाभाडे, राजु शिंगटे, चेतन ठाकरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम