
मनपास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्सहात्
मनपास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धाउत्सहात्
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव महानगरपालिका आणि जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या विशेष सहकार्याने आयोजित मनपा स्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेला कांताई सभागृह येथे उत्साहात सुरुवात झाली. शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी १४ वर्षांखालील मुलं आणि मुलींच्या गटातील स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेत ३५ शाळांमधून १०१ मुलं आणि ७६ मुली सहभागी झाल्या. आठ डावांच्या या चुरशीच्या सामन्यांतून प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्तरासाठी करण्यात आली. विजयी व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे स्वर्ण, रजत आणि कांस्य पदकांनी गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण प्रसंगी महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुख शेख आणि जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे प्रवीण ठाकरे यांनी विजेत्या खेळाडूंना सन्मानित केले.
या स्पर्धेत मुख्य पंच प्रवीण ठाकरे तर सहाय्यक पंच आकाश धनगर, दीपक सावळे, प्रशांत पाटील आणि सोमदत्त तिवारी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
विजयी आणि निवड झालेल्या खेळाडू –
मुलं (१४ वर्षांखालील गट):
तसीन रफिक तडवी – सेंट टेरेसा
आरुष अक्षय सरोदे – सेंट जोसेफ
अर्णव आशुतोष मंडोरे – सेंट जोसेफ
शौर्य मनीष बाहेती – सेंट टेरेसा
चिन्मय सचिन मगर – सेंट जोसेफ
(राखीव: प्रकाश शर्मा – सेंट लॉरेन्स)
मुली (१४ वर्षांखालील गट):
विद्या विनोद बागुल – अनुभूती
लावण्या प्रदीप चव्हाण – सेंट लॉरेन्स
बुशरा इरफान खाटीक – इकरा शाईन
शिफा जमील खाटीक – मनपा शाळा क्र. १
अलिया अमीन खान – इकरा शाईन
(राखीव: अस्मिजान शेख – इकरा शाईन)

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम