मनपा निवडणूक: तहसीलदार शीतल राजपूत यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती

बातमी शेअर करा...

मनपा निवडणूक: तहसीलदार शीतल राजपूत यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती

जळगाव प्रतिनिधी जळगावच्या तहसीलदार शीतल राजपूत यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली असून, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे सुधारित आदेश जाहीर केले आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडावी, या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यासाठी सहा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जितेंद्र पाटील, निवृत्ती गायकवाड, जितेंद्र कुवर, महेश चौधरी, मंजूषा घाटगे आणि विनय गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी सुरेश कोळी, मंजूश्री गायकवाड, घृष्णेश्वर साळुंके, पंकज गोसावी, दादाजी जाधव, प्रसाद पुराणिक, ज्योती वसावे, जयंत शिरसाठ, ज्योती गुंजाळ, अविनाश गांगोडे, प्रकाश पाटील, विजय सूर्यवंशी, मंगेश देवरे, विशाल सुर्वे, विनोद पाटील, नितीन बागुल आणि विजय मराठे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर नियोजनाला वेग आला असून, आगामी काळात निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध टप्प्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम