
मनपा निवडणूक : तिसऱ्या दिवशी ४२४ अर्ज विक्री; मात्र केवळ एकच अर्ज दाखल
मनपा निवडणूक : तिसऱ्या दिवशी ४२४ अर्ज विक्री; मात्र केवळ एकच अर्ज दाखल
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांचा उत्साह कायम आहे. मात्र, अर्ज दाखल करण्याबाबत अद्याप सावध भूमिका दिसत आहे. शुक्रवार २६ डिसेंबर रोजी ४२४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली, तरी दिवसभरात केवळ एकच अर्ज दाखल झाला.
२३ डिसेंबरपासून अर्ज विक्री सुरू झाली. पहिल्या दिवशी ७७७, दुसऱ्या दिवशी ६१८ तर तिसऱ्या दिवशी ४२४ अर्ज विकले गेले. तीन दिवसांत एकूण १,८१९ अर्जांची विक्री झाली आहे.
तिसऱ्या दिवशी प्रभागनिहाय अर्ज विक्री :
- प्रभाग ३ : ४१ (सर्वाधिक)
- प्रभाग ८ : ३७
- प्रभाग १० : ३६
- प्रभाग १२ : २९
- प्रभाग १४ : २८
- प्रभाग १६ : २७
- प्रभाग १७ : २४
- प्रभाग १५ : २३
- प्रभाग ५ व ६ : प्रत्येकी २२
- प्रभाग ४ व ९ : प्रत्येकी २०
- प्रभाग २ : १९
- प्रभाग ७ व १३ : प्रत्येकी १५
- प्रभाग १ व १९ : प्रत्येकी १३
- प्रभाग ११ : ११
- प्रभाग १८ : ९ (कमीत कमी)
अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट असल्याने आणि चुका टाळण्यासाठी अनेक उमेदवार अंतिम दिवसांची वाट पाहत आहेत. येत्या दिवसांत अर्ज दाखल होण्याच्या संख्येत मोठी वाढ होईल आणि निवडणुकीची खरी रंगत येईल, अशी चिन्हे आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम