मनपा प्रभाग रचनेवर आठ हरकती दाखल; नागरिकांनी मांडल्या विविध मागण्या

बातमी शेअर करा...

मनपा प्रभाग रचनेवर आठ हरकती दाखल; नागरिकांनी मांडल्या विविध मागण्या

जळगाव : महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली असून या प्रभाग रचनेवर हरकती मागविण्यात आल्या आहेत. मंगळवारी ८ जणांनी सात प्रभागांमधील प्रभाग रचनेवर हरकत घेतल्या आहेत.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. ही प्रारूप प्रभाग रचना दि.३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली असून दि.१५ सप्टेंबर पर्यंत त्यावर हरकती दाखल करता येणार आहेत. त्यामुळे शहरातील विविध भागातील इच्छुकांकडून हरकती नोंदविण्यात येत आहेत. मंगळवारी आठ लोकांनी ७ प्रभागांवर हरकती घेतल्या आहेत. यामध्ये सौरभ
चौधरी यांनी प्रभाग क्रमांक ५ वर हरकत घेतली असून तुकाराम वाडी, जाणकी नगर, आंबेडकर मार्केट, गणेश वाडी हा भाग प्रभाग क्रमांक ६ मध्ये जोडण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तर, दिपक आंभोरे यांनी प्रभाग क्रमांक ३ वर हरकत घेतली असून प्रभाग तीन मधील खेडी गाव काढण्यात यावे व कांचननगर, हरी ओम नगर तीनमध्ये समाविष्ठ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पियुष कोल्हे यांनी प्रगणक गट क्रमांक ३२, ३३, ३४ वगळण्यात यावे व ११२, ११३, ११४, ११७ चा समावेश करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. आशिष सपकाळे यांनी प्रभाग क्रमांक १० च्या प्रभाग रचनेवर हरकत घेतली असून प्रभाग क्रमांक १० मध्ये केलेल्या बदल रद्द करून पुर्वी प्रमाणेच प्रभाग रचना जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. सुनील हिलाल पाटील यांनी प्रभाग क्रमांक ९ मधील गट नंबर ३४ १ हे प्रभाग क्रमांक ८ व ९ मध्ये विभागले गेले असून त्या भागाचा ९ मध्ये एकत्रित ठेवण्यात यावे, अशी मागणी केली. मिनाक्षी पाटील यांनी श्रीकृष्णनगर हे १६ नंबरमध्ये घेण्यात आले असून श्रीकृष्णनगर प्रभाग क्रमांक ३ मध्ये घेण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दिपक पुंडलिक बाविस्कर यांनी १७ वर हरकत घेतली असून या प्रभागाची रचनाच चुकीची झाली असल्याचे नमुद करत या प्रभागाची रचना आधीच्या प्रभाग क्रमांक १५ प्रमाणेच सुधारीत करण्यात यावी, अशी मागणी बाविस्कर यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम