मनमाड येथे सन्मान मातृत्वाचा सोहळा व पत्रकार कार्यशाळा
पत्रकारांच्याकुटुंबीय आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव
मनमाड i प्रतिनिधी
शहर पत्रकार संघ व नांदगाव तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन्मान मातृत्वाचा सोहळा व पत्रकार कार्यशाळा, कारगिल युद्धातील विर नायक दीपाचंद ,जय महाराष्ट्र वाहिनीचे प्रसाद काथे, मनमाड गुरुद्वाराचे बाबा रणजीतसिंग,जेष्ठ पत्रकार बळवंतराव आव्हाड, संजीव निकम, बब्बू शेख, आझाद आव्हाड,नाना अहिरे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या सोहळ्या निमित्ताने तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या व्यक्ती व संस्थाचा ,दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबीयांचा , तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या मातांचा, वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्यात आला.
जेष्ठ पत्रकार प्रसाद काथे यांनी मी या नांदगाव तालुक्याशी सबंधित असून माझे आजोबा स्वातंत्रवीर सावरकर,अनंत कान्हेरे यांचे सहकारी होते, व जॅक्सन वधातील आरोपी होते. पत्रकाराचे आई-वडील होणे तुलनेने सोपं आहे, पण पत्रकराची पत्नी होणे सोपे नाही. ग्रामीण भागातील पत्रकारिता करणे अतिशय अवघड असून आम्ही स्टुडिओत बसून पत्रिकारीता करतो,पण आपण प्रत्यक्ष फील्ड वर काम करतात,असे सांगून देश अस्थिर ते कडे जाऊ द्यायचा नसेल तर आपण आपले काम अधिक जवाबदारी केले पाहिजे.पत्रकारांनी व्यासना पासून दूर राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.नायक दिपचंद यांनी या निमित्त बोलताना सैनिकी काळातील आपले अनुभव कथन करून, मिळालेले जीवन सार्थक करण्या साठी देशसेवा केली पाहिजे. कोणतेही काम आपण ते छोटे न समजता मनापासून केले पाहिजे.पत्रकारितेच्या माध्यमातून आपण फार मोठी देश सेवा बजावत आहात असे सांगून पत्रकारांचा गौरव केला
.श्रीकांत सोनवणे यांनी देशातील पहिला पत्रकार बेंगोल गॅझेट वृत्तपत्राचा हिकी याचे उदाहरण देऊन त्याने वस्तुस्थिती समोर आणण्या साठी तुरुंगवास स्वीकारल्याचे सांगितले प्रामाणिक पने पत्रकारिता करावी असे आवाहन केले . बळवंतराव आव्हाड यांनी पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केलं.संजीव निकम यांनी देखील उपक्रमाबद्दल कौतुक केले. सोहळ्याचे प्रास्ताविक आझाद आव्हाड यांनी केले,आभार विशाल पवार यांनी मानले. सूत्र संचालन हर्षद गद्रे यांनी केले. मनमाड शहर पत्रकार संघ व नांदगाव तालुका डिजिटल पत्रकार संघाच्या सर्व सभासदांनी सोहळ्याचे नियोजन व संयोजन केले. फोटो मेल केला आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम