
मनियार बिरादरीचा कौतुकास्पद उपक्रम; गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप
जळगाव: जळगाव जिल्हा मनियार बिरादरीने समाजकल्याण आणि प्रगतीसाठी एक स्तुत्य उपक्रम राबवला. गरीब आणि गरजू महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांना १० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांना स्वयंरोजगार सुरू करता येणार असून, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.
या कार्यक्रमात बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख म्हणाले, “समाजातील प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाणे आणि त्यांना शिक्षण व स्वयंरोजगाराद्वारे स्वावलंबी बनवणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमात बिरादरीने शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव केला. चांगले गुण मिळवून समाजाचे नाव उंचावणाऱ्या या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
यावेळी बिरादरीचे पदाधिकारी, सदस्य आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनियार बिरादरी भविष्यातही समाजसेवा, शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात असे उपक्रम राबवत राहील, असे याप्रसंगी सांगण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम