मनुदेवी येथील तलावात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा...

मनुदेवी येथील तलावात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

यावल प्रतिनिधी यावल तालुक्यातील श्रीक्षेत्र मनुदेवी परिसरातील पाझर तलावात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ६ सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या या तरुणाचा मृतदेह आज (७ सप्टेंबर) सकाळी अकरा वाजता सापडला.

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या खालकोट या आदिवासी वस्तीवरील काही तरुण गणेश विसर्जनासाठी मनुदेवी मंदिर परिसरात असलेल्या पाझर तलावावर गेले होते. गणपती विसर्जन करत असताना रोहिदास शिवराम लहानगे (वय ४२) यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले आणि बेपत्ता झाले.

संध्याकाळ झाल्यामुळे अंधारात त्यांना शोधता आले नाही. आज सकाळी कोळन्हावी परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी त्यांचा मृतदेह शोधून काढला.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार किशोर परदेशी हे पुढील तपास करत आहेत.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम