शहादा l प्रतिनिधी
भोई समाजाच्या मनोरुग्ण महिला सौ. सिंधूबाई भोई त्यांच्या पती नारायण भोई जवळ पोहचवले उमाकांत शिवाजी पाटील (सामाजिक कार्यकर्ते )यांनी श्रीक्षेत्र प्रकाशा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील सौ. सिंधूबाई नारायण जावरे (भोई )या मानसिक आजारी असल्याने त्यांच्या गावाहून शेल्टी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे पायी चालत आल्या होत्या.
गावातील देविदास पाटील यांनी उमाकांत शिवाजी पाटील यांना फोन केला ते लगेचच शेल्टी बस स्थानक येथे आले व त्यांनी त्या महिलेशी बोलून त्यांनी शहादा तालुका भोई समाज अध्यक्ष नरेंद्र वाडिले यांना फोन करून माहिती दिली. त्या नंतर व्हॉट्सॲप द्वारे त्या महिलेचा फोटो फोटो शेर केल्याने त्या महिलेचा तपास लागला.
शेल्टी येथील उमाकांत शिवाजी पाटील (सामाजिक कार्यकर्ते )यांनी स्वतः भाडे खर्चून त्या महिलेला श्रीक्षेत्र प्रकाशा येथील त्यांचे पती नारायण भोई यांच्या जवळ पोहचवले.
उमाकांत शिवाजी पाटील यांनी या आधी सहा मनोरुग्ण आदिवासी पुरुष व एक आदिवासी महिला मनोरुग्ण व ही सातवी महिला मनोरुग्ण भोई समाज यांना तिच्या पती जवळ पोहचवले आहे.
या वेळी श्रीक्षेत्र प्रकाशा येथील ग्रामपंचायत सदस्य सौ ज्योतीताई मोरे यांचे पती उज्वल मोरे यांनी देखील फोन द्वारे संपर्क केला. शेल्टी येथील देविदास साहेबराव पाटील विकास सिताराम पाटील. जितेंद्र रवींद्र पाटील, राहुल हिंमत गिरासे यांनी देखील मदत केली. उमाकांत पाटील यांनी केलेल्या कामाबद्दल सर्व ठिकाणी त्यांचे कौतुक केले जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम