मन्याड धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

बातमी शेअर करा...

मन्याड धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

चाळीसगाव : मन्याड धरण परिसरात सलग अतिवृष्टीमुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली असून मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर) सकाळी ११ वाजल्यापासून धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

माहितीनुसार, माणिकपुंज प्रकल्पातून अंदाजे ४ ते ५ हजार क्युसेक पाणी सोडले जात असून हातगाव लपा, राजदेहरे लपा, देश नाला, स्थानिक नाले व पाझर तलाव यांमधील पाण्याचा विसर्ग मिळून एकूण १४ ते १५ हजार क्युसेक पाणी मन्याड धरणात जमा होत आहे. त्यामुळे धरणातून तसेच सांडव्या वरून नदीकडे पाण्याचा मोठ्या प्रमाणात ओघ सुरू आहे.

यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पशुधन, शेतीमाल, मोटारपंप, गुरेढोरे व इतर साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. तसेच कोणतीही जीवित वा वित्तीय हानी टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

ही माहिती उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम