
मन्यार बिरादरीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात पहलगाम हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली
पाकिस्तानचा झेंडा फाडून तीव्र निषेध
मन्यार बिरादरीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात पहलगाम हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली
पाकिस्तानचा झेंडा फाडून तीव्र निषेध
जळगाव | शिजगर मुस्लिम समाज फाउंडेशन, सुप्रीम कॉलनी यांच्या वतीने भव्य तिसऱ्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी जळगाव जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी महत्त्वाचे तीन ठराव सादर केले, ज्यास सर्व सन्मित्रांनी एकमताने मंजुरी दिली.
कार्यक्रमात २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या २६ भारतीय वीरांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अतिरेक्यांचा तीव्र निषेध करत नववधूंच्या हस्ते पाकिस्तानचा झेंडा व अतिरेक्याच्या प्रतिमेचे फाडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
या विशेष प्रसंगी जिल्हाध्यक्ष फारुक शेख, सुप्रीम बिरादरीचे अध्यक्ष डॉ. फिरोज अहमद, अर्कोचे बशीर बुरहानी, टिकी इस्टेटचे कादर कच्ची, अब्दुल ट्रान्सपोर्टचे अन्वर खान, कुलजमातीचे सय्यद चांद, मरकजचे सलीम सेट, मुक्ताईनगरचे हकीम चौधरी, यावलचे करीम मेंबर, पाचोरचे इरफान इकबाल, साखळीचे असलम खान यांच्यासह शेकडो मान्यवर आणि हजारो लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिजगर समाज फाउंडेशनचे शेख फारूक, शेख आसिफ शेख अखिल, नूर मोहम्मद, अफजल मणियार, अकील करीम यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम