
मयुरी हिलाल पाटील यांना वाणिज्य व व्यवस्थापन विषयात पीएच.डी प्रदान
मयुरी हिलाल पाटील यांना वाणिज्य व व्यवस्थापन विषयात पीएच.डी प्रदान
जळगांव – धरणगांव तालुक्यातील भोद बु. येथील मयुरी हिलाल पाटील ( देसले) यांना नुकतीच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून वाणिज्य व व्यवस्थापन विषयात पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
ॲड. एस. ए. बाहेती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल लोहार सर यांच्या मार्गदर्शनाखाली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून “असेसमेंट ऑफ व्हेरिअस मोटीव्हेशनल स्ट्रॅटेजी फॉर इंप्रोविंग कॉलेज टीचर्स परफॉर्मन्स इन के.बी.सी.एन.एम.यु.रिजन
या विषयातून त्यांना पीएच डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. दरम्यान दि. १७/०९/२०२५ रोजी क.ब.चौ.उ.म.वी चे कुलगुरू मा.प्रा.विजय माहेश्वरी सर व प्र-कुलगुरू मा.प्रा.एस.टी. इंगळे सर यांनी त्यांचे नोटिफिकेशन देऊन कौतुक केले.
डॉ. मयुरी हिलाल देसले(पाटील) यांचे क्रीडा रसिक एज्युकेशन सोसायटी इन्स्टियूट ऑफ मॅनेजमेन्ट ऍण्ड रिसर्चच्या अध्यक्षा श्रीमती.उज्वला बाहेती, सचिव ॲड.रोहन बाहेती, ॲड.एस.ए. बाहेती महाविद्यालयाचे प्राचार्य व मार्गदर्शक डॉ. अनिल लोहार सर डॉ. महाले सर,डॉ. पटेल सर तसेच श्री. हिलाल रायभान पाटील, सुनिता पाटील, डॉ.कांचन देसले, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम श्री. प्रा. हेमंत पाटील, श्रीमती. लीलावती भाऊराव पवार व प्रा.सौरभ देसले यांनी डॉ. मयुरी हिलाल पाटील(देसले) यांचे अभिनंदन व कौतुक केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम