मराठा सेवा संसंघातर्फे ९ फेब्रुवारी खान्देशस्तरीय वधुवर परिचय मेळावा
वधु -वर नोंदणी अंतिम टप्प्यात
मराठा सेवा संसंघातर्फे ९ फेब्रुवारी खान्देशस्तरीय वधुवर परिचय मेळावा
वधु -वर नोंदणी अंतिम टप्प्यात
धुळे प्रतिनिधी
धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वधुवर सुचक व सामुदायिक विवाह कक्षाच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे “भव्य
खान्देशस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे”आयोजन ९ फेब्रुवारी वारी २०२५ रोजी हिरे भवन” स्टेशन रोड धुळे येथे करण्यात आलेले असुन
सदर मेळाव्यात प्रकाशित करण्यात येणाय्रा अतिशय सुंदर व उपयुक्त अशा ‘रेशिमगाठी मराठा अनुरूप’ या
वधु -वर पुस्तिके साठी नावनोंदणीस संपूर्ण खान्देशातील महाराष्ट्रात विविध भागात स्थायिक झालेल्या समाजबांधवांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असून खान्देशातील ८० नोंदणी प्रतिनिधीं मार्फत नावनोंदणी सुरू आहे
९फेब्रुवारी २०२५ रोजी प्रकाशित करण्यात येणाऱ्या पुस्तिकेची छपाई देखील सुरू झाली असून
छपाईचे काम सुरळीत व्हावे यासाठी नावनोंदणी
अंतिम दिनांक २५/०१/२०२५ जाहीर करण्यात आला आहे
नावनोंदणी केल्याने एकाचवेळी ५ ते १० हजार लोकांपुढे आपलं स्थळ जाते* व आपल्याला आवश्यक तसा प्रस्ताव येतो हे महत्त्व नातेवाईकांना अनुभवायला पण मिळाले तसेच गेल्या वेळी प्रकाशित केलेल्या “रेशीमगाठी” या वधुवर पुस्तिकेतील *असंख्य विवाह जुळून आल्यामुळे* समाजबांधवांनी स्वयंत्स्फूर्तिने नावनोंदणी केली आहे
नावनोंदणी करणाय्रा सदस्यांना वधुवर पुस्तिका मोफत देण्यात येणार असून, मंडळाचे माध्यमातून स्वतंत्र अत्याधुनिक रेशीमगाठी मराठा मॅट्रिमोनी ॲपवर देखील सदरची नावे विनाशुल्क अपलोड केली जाणार असल्याने
सर्वांनी आपल्या संपर्कातील आपल्या मित्रपरिवार नातेवाईक यांच्या उपवर मुला मुलींचे बायोडाटा नावनोंदणी करून घ्यावे
वेळ कमी उरला असल्याने नावनोंदणी साठी व्हॅट्सॲप च्या माध्यमातून देखील पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे,* त्यासाठी पी एन पाटील , अध्यक्ष यांच्या 9421431020 या क्रमांकावर संपर्क साधावा व या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त समाजबांधवांनी लाभ घ्यावा व अंतिम मुदतीपूर्वीच नावनोंदणी करावी , मेळाव्यास उपस्थित सर्व समाजबांधवांसाठी स्नेहभोजनाची देखील सोय करण्यात येते असते,
मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जास्तीत जास्त समाजबांधवांना या सुवर्णसंधीचा लाभ घेता यावा यासाठी सध्या मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी, वधुवर मंडळ पदाधिकारी, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड मार्फत ग्रामीण भागातील समाजबांधवांना माहिती देण्यासाठी संपूर्ण खान्देशातील ग्रामीण भागात संपर्क व संवाद दौरा सुरू केला आहे गावोगावी पाॅम्प्लेट वाटप करण्यात येत असून ग्रामीण भागातील समाजबांधवांच्या खास आग्रहास्तव नावनोंदणीसाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे.
मेळाव्यास आपल्या उपवर मुला मुलींसह जास्तीत जास्त पालकांनी उपस्थित राहुन आपल्या मुलामुलींचे विवाह जुळुन येण्यासाठी सुरुवात करावी
असे आवाहन मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम