मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने केंद्र व राज्य शासनाचे मानले आभार

अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांनी कोमसाप, अंबर भरारी तर्फे पाठवली होती दहा हजारावर पत्रे

बातमी शेअर करा...

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने केंद्र व राज्य शासनाचे मानले आभार

अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांनी कोमसाप, अंबर भरारी तर्फे पाठवली होती दहा हजारावर पत्रे

अंबरनाथ l प्रतिनिधी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ह्या सुरेश भटांच्या ओळी जशाच्या तशा काल रात्री ओठी आल्या आणि कारण होते टीव्ही वर झळकणाऱ्या बातम्या

मराठी

पंतप्रधान मोदींनी मराठीस अभिजात भाषेचा दर्जा केंद्रामार्फत दिल्याच समजले आणि आनंदाश्रू तरळले.

त्या मागे अनेक लोकांचा सक्रिय सहभाग होता आणि त्यामागच्या अनेक आठवणी दाटून आल्या.

केंद्र पातळीवर राज्य पातळीवर अनेकांनी अनेक प्रयत्न, भेटी गाठी, पत्र व्यवहार केलेही असतील.

पण अंबरनाथ मधील आपले अंबर भरारी चे सदस्य, कोमसाप, योगिनी महिला मंडळ, सुयोग महिला, जेष्ठ नागरिक संघ, तसेच रोटरी चे सदस्य हे ही मागे नव्हते.

आपण जवळपास दहा हजार पत्रे महाराष्ट्र शासन ह्यांकडे पाठवली होती.

त्यासोबत अनेक कार्यक्रम आपण राबवले होते.

कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी (जयंती) आपण अनेकादी कार्यक्रम घेऊन जय घोष केला होता.

अभिजात भाषा दर्जा प्राप्त करून दिल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तमाम अंबरनाथकरांना अनेक शुभेच्छा देतो.

“येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी”

आपला,
श्री सुनील चौधरी
माजी नगराध्यक्ष
माजी अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद
अंबरनाथ

हे ही वाचा 👇

सिडबी बँकेचे उदघाटन; MSME क्षेत्राला मिळणार नवे आर्थिक पाठबळ

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम