मराठीला अभिजात दर्जा; ‘अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा’ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

बातमी शेअर करा...

मराठीला अभिजात दर्जा; ‘अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा’ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 

मुंबई: मराठी भाषेला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधून राज्य शासनाने ३ ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ आणि ३ ते ९ ऑक्टोबर हा आठवडा ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सप्ताहाच्या निमित्ताने मराठी भाषा विभागातर्फे ‘मराठी भाषा दूत’ ही ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जगभरातील १८ ते २१ वयोगटातील मराठी भाषिक सहभागी होऊ शकतात. स्पर्धकांना “अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा” या विषयावर जास्तीत जास्त तीन मिनिटांपर्यंत आपले विचार मांडायचे आहेत.

ऑगस्ट मीडिया संस्थेच्या सहकार्याने आयोजित ही स्पर्धा ८ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातून प्रथम नोंदणी करणाऱ्या १००० स्पर्धकांना यात प्रवेश दिला जाईल.

या स्पर्धेच्या माध्यमातून विषय प्रभावीपणे मांडणाऱ्या १०० उत्तम स्पर्धकांची निवड “मराठी भाषा दूत” म्हणून केली जाईल. तसेच, सर्व सहभागींना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५, रात्री १२ पर्यंत आहे. १८ ते २१ वयोगटातील जास्तीत जास्त तरुणांनी https://forms.gle/NYvWxvYCSFXCjkzn9 या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन मराठी भाषा विभागाने केले आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम