महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थने भागविली हजारो भाविकांची तृष्णा

बातमी शेअर करा...

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थने भागविली हजारो भाविकांची तृष्णा

जळगाव – भुकेलेल्यांना भोजन आणि तहानलेल्यांना पाणी दिल्याचे मोठे पुण्य लाभते, असे म्हटले जाते. त्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थने सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून महर्षी वाल्मिक जयंती निमित्त पाणी वाटप केले. ज्या द्वारे हजारो नागरिकांची तृष्णा भागविली.

महर्षी वाल्मिक जयंती निमित्त जळगाव शहरातील नेहरू चौक येथे रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थद्वारे पाणी वाटप साठी स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलला आमदार राजू मामा भोळे, गोदावरी फौंडेशन च्या संचालिका तथा भाजपा जळगाव जिल्हा पूर्वच्या सर चिटणीस डॉ केतकी ताई पाटील, अरविंद देशमुख, दीपक सूर्यवंशी, हरीश मुंदडा, डॉ वीरेंद्र खडके, सुनील सरोदे, विराज कावडिया आदींनी भेट दिली.
रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थ चे प्रेसिडेंट बिपिन पाटील,चंदन कोल्हे, सेक्रेटरी भरत कर्डीले,प्रोजेक्ट चेअरमन रुपेश सरोदे, संकेत पाटील, सचिन पाटील, गौतम चौधरी, अमेय तळेले, अमोल धांडे, राहुल सरोदे, निखिल झोपे, सोहम खडके, विजय कासार आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम