चोपडा l प्रतिनिधी
जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी चोपडा गोदाम व्यवस्थापक यांची महसूल कर्मचारी संघटनेच्या दि.०९ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या सर्व साधारण सभेत निवड करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत हॉल येथे महसूल कर्मचारी संघटनेची सर्व साधारण सभा संपन्न झाली. सभेमध्ये सर्वानुमते जिल्हयाची खालील प्रमाणे नविन कार्यकारीणी गठीत करण्यात आली आहे.
अध्यक्ष : योगेश नन्नवरे, गोदाम व्यवस्थापक चोपडा, उपाध्यक्ष : किरण बाविस्कर, मंडळ अधिकारी पिंप्राळा ता. जळगांव, कोषाध्यक्ष घनश्याम सानप, अ. का. कुळकायदा शाखा, जि. का. जळगाव, कार्याध्यक्ष अतुल सानप, अ. का. तहसिल कार्यालय रावेर, सरचिटणीस दिपक चौधरी, अ.का. आस्थापना शाखा, नि.का. जळगांव
वरील प्रमाणे नवनियुक्त पदाधिकारी दि.१० डिसेंबर २०२३ पासुन जळगांव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना चे कार्यभार स्विकारतील याची सर्वांनी नोंद घावी असे जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस दिनकर मराठे यांनी कळविले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम