
महसूल सेवा पंधरवडा अंतर्गत मौजे तरसोद येथे विशेष ग्रामसभा संपन्न
महसूल सेवा पंधरवडा अंतर्गत मौजे तरसोद येथे विशेष ग्रामसभा संपन्न
तरसोद (प्रतिनिधी): येत्या १७ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या महसूल सेवा पंधरवड्याच्या नियोजनासाठी मौजे तरसोद येथील तलाठी कार्यालयात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
या ग्रामसभेत महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. शीत शिवार रस्ते, पानंद रस्ते तसेच गाव नकाशावर नसणारे पण वहिवाटीचे रस्ते यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून सर्व शेतकऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या. याशिवाय दाखले वितरण, क्षेत्रस्ते मोकळे करणे, रस्त्यांना क्रमांक प्रदान करणे, जिवंत सातबारा अंतर्गत वारस नोंदी करणे अशा विविध सेवा महसूल सेवा पंधरवड्यात उपलब्ध होणार असल्याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
या विशेष ग्रामसभेला सरपंच संतोष सावकारे, ग्रामपंचायत सदस्य बऱ्हाटे मंडळ, मंडळ अधिकारी मिलिंद देवरे, ग्रामसेवक नरेंद्र साळुंखे, ग्राम महसूल अधिकारी रुपेश ठाकूर, महसूल सेवक ज्ञानेश्वर कोळी तसेच ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम