महाकुंभ २०२५ : महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाची अभिनव संकल्पना
त्रिवेणीवर अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम!
प्रयागराज : महाकुंभ मेळा, विविध धार्मिक कृती, परंपरा, विधी, उपासना, गंगाजल, तीर्थक्षेत्र, तसेच संगीत, नृत्य आदींच्या यामागे किती मोठे विज्ञान आहे, हे दर्शवणारे अद्वितीय प्रदर्शन महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात लावण्यात आले आहे. तसेच या कुंभमेळ्यातील विविध धार्मिक कृतींबाबत महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या (MAV) वतीने वैज्ञानिक संशोधनही करण्यात येणार आहे. एकूणच प्रयागराज येथील गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या पवित्रतम त्रिवेणी संगमावर आता अध्यात्म आणि विज्ञान यांचा अनोखा संगम पाहण्याची संधी भाविकांना लाभणार आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले. या वेळी पत्रकार परिषदेला विश्वविद्यालयाचे अध्यात्मिक उपचारातील तज्ज्ञ श्री. कृष्णा मांडावा, कु. ज्योत्सना गांधी आणि सुजाता ठक्कर यांनी संबोधित केले.
प्रयागराज कुंभमेळ्यातील कैलाशपुरी मार्ग, कला कुंभच्या समोर, सेक्टर ७ येथे हे प्रदर्शन उभारण्यात आले असून १२ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन चालू रहाणार आहे. हे सर्व संशोधन कार्य ऑरा आणि ऊर्जा स्कॅनर्स, तसेच वैज्ञानिक उपकरणांच्या मदतीने केले जाते. हे शैक्षणिक समुदाय आणि जगभरातील लोकांकडून चांगल्या प्रकारे स्वीकारले गेले आहे. आध्यात्मिकतेच्या माध्यमातून जागतिक चेतनेचा विकास करणे आणि भारतीय ज्ञान परंपरेच्या गहन पैलूंचे जागतिक पटलावर दर्शन घडवणे, हे महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाचे उद्दीष्ट आहे.
प्रदर्शनातील वैशिष्ट्यपूर्ण माहिती : या वेळी श्री. कृष्णा मांडवा यांनी सांगितले की, अमृत स्नानादरम्यान गंगाजलाचा सकारात्मक प्रभाव, त्रिवेणी संगमाच्या जलाचे आध्यात्मिक कंपन आणि त्याचा मानव जीवनावर होणारा परिणाम यावर आधारित विशेष संशोधन व्हिडिओ प्रदर्शनात दाखवले जातील. MAV च्या संगीत आणि नृत्य विभागाने ७०० हून अधिक प्रयोग केले आहेत. भक्तिभावयुक्त कथक नृत्याचे विशेष व्हिडिओ प्रदर्शनात सादर करण्यात येतील. २० वर्षांपासून एक्झिमा (त्वचारोग) या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीने नामस्मरणाद्वारे आपला आजार बरा केला, याचेही उदाहरण प्रदर्शनात सादर करण्यात येईल.
महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाचे दृष्टीकोन : या वेळी सुजाता ठक्कर म्हणाल्या की, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी केली. विद्यापीठाचे ध्येय ऋग्वेदातील प्रसिद्ध श्लोक ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’ या ओळीने प्रेरित आहे. MAVचा उद्देश साधना, सनातन वैदिक धर्म आणि भारतीय ज्ञान प्रणालीचा प्रसार करून मानव जीवन सात्विक व सकारात्मक बनवणे आहे. अध्यात्मिक संशोधनाद्वारे हे सिद्ध झाले आहे की भारतीय संस्कृतीतील प्रत्येक घटक उच्च सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करण्यासाठी तयार केला आहे.
महाकुंभ २०२५ मधील विशेष उपक्रम : महाकुंभ २०२५ दरम्यान MAV ने त्रिवेणी संगमावर आध्यात्मिक शुद्धता आणि सकारात्मकतेवर सखोल संशोधन करण्याचे ठरवले आहे. यामध्ये प्रमुख विषय खालीलप्रमाणे आहेत. १. अमृत स्नानाचा प्रभाव : स्नानापूर्वी आणि स्नानानंतर भाविकांवर होणार्या आध्यात्मिक परिणामांचे अध्ययन. २. पाणी, माती आणि हवेचे परीक्षण : पौष पौर्णिमेपासून महाशिवरात्रीपर्यंत कुंभमेळ्यातील परीक्षण. ३. कल्पवासाचे महत्त्व : कल्पवासादरम्यान भाविक आणि पर्यावरणावर होणार्या परिणामांचे अध्ययन. ४. अक्षयवटाचे अध्ययन : कुंभमेळ्याच्या कालावधीत त्याच्या आध्यात्मिक परिणामांचे विश्लेषण केले जाणार आहे.
या वेळी २०१९ च्या कुंभमेळ्यात MAV ने केलेल्या संशोधनाचे निष्कर्षही सर्वांसमोर मांडण्यात आले. ज्यामध्ये अमृतस्नानच्या वेळी संगमाच्या पाण्यात विशेष आध्यात्मिक गुण आढळल्याची माहिती देण्यात आली.
आध्यात्मिकता आणि विज्ञानाचा मिलन : MAV च्या कु. ज्योत्सना गांधी म्हणाल्या की, MAV ने प्रगत वैज्ञानिक उपकरणांचा उपयोग करून गंगा जल, मणिकर्णिका घाट आणि इतर पवित्र स्थळांच्या आध्यात्मिक परिणामांचा अभ्यास केला. एका विशेष संशोधनात मणिकर्णिका घाटाचे पाणी अत्यंत शुद्ध असल्याचे आढळले. याबाबतचा अभ्यासपूर्ण व्हिडिओ (https://www.youtube.com/
MAV चे आंतरराष्ट्रीय योगदान : MAV ने १४ देशांमध्ये १२० पेक्षा जास्त परिषदांमध्ये आपले संशोधन सादर केले आणि अनेक पुरस्कार जिंकले आहेत. भारताच्या G20 अध्यक्षतेदरम्यान, MAV ने गोव्यात C20 कार्यक्रमाचे आयोजन केले. अलीकडेच, विद्यापीठाने COP29 परिषदेत जलवायू बदलावर मुख्य भाषण दिले.
संशोधनाधारित उपचार : MAV ने मानसिक आणि शारीरिक आजारांवर संशोधन केले असून एक्झिमा, नैराश्य आणि व्यसनांवर प्रभावी परिणाम मिळवले आहेत. विशेष नामजप आणि उपचार पद्धतींद्वारे व्यसनांवर नियंत्रण मिळवण्यात MAVला यश आले आहे. तसेच MAVच्या ५ दिवसीय आध्यात्मिक कार्यशाळांमध्ये साधकांना आध्यात्मिक विकास, उपचार पद्धती आणि तणावमुक्त जीवनशैली शिकवली जाते.
नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात : शैक्षणिक संस्थांच्या मागणीनुसार MAV ने भारतीय ज्ञान प्रणाली व राष्ट्रीय शिक्षण धोरणावर आधारित अभ्यासक्रम विकसित केला आहे. हा अभ्यासक्रम प्राचीन भारतीय ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा संगम आहे. MAV चे उद्दिष्ट म्हणजे सनातन धर्म आणि भारतीय परंपरांचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे आहे. अधिक माहितीसाठी info@spiritual.university इ-मेलवर, तसेच www.spiritual.university या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम