
महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर
महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजन
जळगाव (प्रतिनीधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात क्रांतीसुर्य महात्मा फुले व प्रज्ञासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर शनिवार दि. १२ एप्रिल रोजी घेण्यात आले.
यावेळी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्र-कुलगुरु एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, व्य.प.सदस्य प्रा.म.सु.पगारे, प्रा.पवित्रा पाटील, अधिष्ठाता अनिल डोंगरे, जयंती महोत्सवाचे समन्वयक डॉ. उमेश गोगडीया व सहसमन्वयक सुभाष पवार व विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते. या रक्तदान शिबीरात विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी असे एकुण ६४ व्यक्तींनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराकरीता इंडीयन रेडक्रॉस सोसायटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविंद चौधरी, टेक्नीशियन रोहीणी देवकर, सुजाता वाघ, भाग्यश्री सपकाळ, सहाय्यक किरण बाविस्कर व अमिर शाह यांनी सहकार्य केले. या रक्तदान शिबीराचे आयोजन विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत बौध्द अध्ययन व संशोधन केंद्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग, महात्माफुले अध्ययन व सशोधन केंद्र, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि मागासवर्गीय कर्मचारी संघटना, फुले शाहु आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम