
महादेव हॉस्पिटलमध्ये पित्ताशयाची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वी
महादेव हॉस्पिटलमध्ये पित्ताशयाची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वी
शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांच्या टीमला मोठे यश
जळगाव : येथील आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलमध्ये नुकतीच ‘लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टोमी’ (पित्ताशयाची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया) अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली. डॉक्टरांची कौशल्यपूर्ण टीम, भूलतज्ज्ञांचे अचूक नियोजन आणि नर्सिंग स्टाफचे सहकार्य यामुळे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्णाची प्रकृती उत्तम आहे.
या शस्त्रक्रियेत नामांकित सर्जनच्या टीमने आपला सहभाग नोंदवला. यामध्ये डॉ. मिलिंद जोशी, डॉ. परिस वाले, डॉ. शुभम चौधरी आणि डॉ. प्रज्योत कदम या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत कमी वेळात आणि अचूकतेने ही शस्त्रक्रिया पार पडली.शस्त्रक्रिया यशस्वी होण्यामागे भूलतज्ज्ञ डॉ. भरत सोनवणे, डॉ. मारिया फर्नांडिस आणि डॉ. साक्षी सांगोले यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. तसेच, शस्त्रक्रिया कक्षात परिचारक आदिल पटेल, असीम शेख, सिद्दीक मनियार आणि परिचारिका आशा देवरे यांनी सहकार्य केले.
महादेव हॉस्पिटलमधील ही यशोगाथा केवळ एक शस्त्रक्रिया नसून उच्च दर्जाच्या रुग्णसेवेचा पुरावा आहे. हॉस्पिटल प्रशासनाने या यशाबद्दल संपूर्ण वैद्यकीय टीमचे कौतुक केले असून, भविष्यातही अशाच प्रकारे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. “उत्तम समन्वय आणि वैद्यकीय कौशल्यामुळेच आम्ही रुग्णाला सुरक्षित आणि दर्जेदार उपचार देऊ शकलो. संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन, अशी प्रतिक्रिया गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी दिली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम