
महापालिकेत ३ मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
तक्रारदार नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
महापालिकेत ३ मार्च रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
तक्रारदार नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी
महानगरपालिकेत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार मार्च महिन्याच्या पहिल्या सोमवारी (दि.३ मार्च रोजी) आयुक्त स्तरावरील लोकशाही दिन आयोजित करण्यात आला असून या लोकशाही दिनाच्या दिवशी ज्या नागरिकांनी १५
दिवसांपुर्वी तक्रार निवेदन किंवा अर्ज मनपाला दिले असतील त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त शाम गोसावी यांनी केले आहे. दि.३ रोजी सकाळी १० वाजता मनपाच्या सतरामजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात हा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम