महापालिकेतील पाईप चोरीतील मुख्य सूत्रधार महापालिकेचे अधिकारी-ॲड. सतीश मोरे

मुख्यमंत्र्यांकडे कार्यकर्त्यांसह आंदोलन छेडण्याचा इशारा

बातमी शेअर करा...

महापालिकेतील पाईप चोरीतील मुख्य सूत्रधार महापालिकेचे अधिकारी-ॲड. सतीश मोरे

मुख्यमंत्र्यांकडे कार्यकर्त्यांसह आंदोलन छेडण्याचा इशारा
जळगाव प्रतिनिधी – जळगाव महानगरपालिकेतील पाइप चोरी प्रकरणात महापालिका अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप प्रजाशक्ती क्रांती दलाचे राज्य सचिव ॲड. सतीश मोरे यांनी केला आहे.

प्रजाशक्ती क्रांती दलाचे जिल्हा सहसंघटक अमित तडवी यांनी पाइप चोरीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास हे प्रकरण आणले होते. मात्र, आयुक्तांनी तत्काळ कारवाई करण्याऐवजी तक्रार आणि पुरावे मागितले. त्यानंतर तडवी यांनी पुराव्यासह तक्रार अर्ज सादर केला आणि अभियंते योगेश बोरोले यांच्याशी चर्चा केली. तथापि, या तक्रारीवर साधारण महिनाभरानंतर कारवाई झाली, ज्यादरम्यान करोडो रुपयांच्या पाइप आणि इतर वस्तूंची चोरी झाली. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने ही चोरी झाल्याचा आरोप केला जात आहे.

या प्रकरणात तक्रार सादर करताना फोटो काढण्यास महापालिका आयुक्तांनी मनाई केल्याचेही ॲड. सतीश मोरे यांनी सांगितले. जर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर मुख्यमंत्र्यांकडे कार्यकर्त्यांसह आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम