महापालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांची खांदेपालट

बातमी शेअर करा...

महापालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांची खांदेपालट
आयुक्तांच्या आदेशानुसार विविध विभागांमध्ये फेरबदल

जळगाव : महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात खांदेपालट करण्यात आली असून आयुक्तांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. विविध विभागातील लिपिक व कर्मचाऱ्यांची बदली करून त्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

आस्थापना विभागातील बदल
आस्थापना विभागातील लिपीक रविंद्र जाधव यांची बदली प्रभाग समिती क्रमांक ३ मध्ये करण्यात आली आहे. तर प्रभाग समिती क्रमांक ३ चे लिपिक समाधान घोडके यांची बदली आस्थापना विभागात करण्यात आली. याच विभागातील अर्जुन सोनार यांची बदली प्रभाग समिती क्रमांक ४ मध्ये झाली असून त्या ठिकाणी कार्यरत असलेले प्रसाद पवार यांची बदली आस्थापना विभागात करण्यात आली आहे.

महिला व बालकल्याण विभागातील फेरबदल
प्रभाग समिती क्रमांक ३ चे लिपिक राहुल सुशिर यांची बदली महिला बालकल्याण विभागात करण्यात आली असून त्यांच्याकडे जन्म-मृत्यू विभागाचा अतिरिक्त कारभारही सोपविण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभागातील प्रणाली दुसाने यांची बदली प्रभाग समिती क्रमांक ३ मध्ये करण्यात आली आहे.

इतर महत्त्वाचे बदल
आस्थापना विभागातील किशोर विसावे यांची बदली प्रभाग समिती क्रमांक २ मध्ये करण्यात आली असून प्रभाग समिती क्रमांक २ चे लिपिक दिलीप चौधरी यांची बदली आस्थापना विभागात झाली आहे. नगररचना विभागातील इंदूबाई भापकर यांना ई-गव्हर्नन्स विभागात हलविण्यात आले आहे.

अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपविणे
दुसऱ्या आदेशात जनसंपर्क अधिकारी आणि महिला बालकल्याण विभागातील महेंद्र पाटील यांच्याकडे वरिष्ठ लिपिक म्हणून जन्म-मृत्यू नोंदणी विभाग व विवाह नोंदणी कार्यालयाचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे जनसंपर्क विभाग आणि महिला बालकल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला आहे. प्रकल्प विभागातील प्रदीप निबांळकर यांची बदली जन्म-मृत्यू विभागात करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम