महापुरुषांनी राष्ट्र विकासासाठी मोठे योगदान दिले – प्रा. एस. टी. इंगळे

विद्यापीठात रमाई आंबेडकर जयंती महोत्सवाला सुरुवात

बातमी शेअर करा...

महापुरुषांनी राष्ट्र विकासासाठी मोठे योगदान दिले – प्रा. एस. टी. इंगळे

विद्यापीठात रमाई आंबेडकर जयंती महोत्सवाला सुरुवात

जळगाव प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे प्रशाळेत डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने गुरुवारपासून रमाई आंबेडकर जयंती महोत्सवाला सुरुवात झाली.p

दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते झाले.यावेळी उद्घाटकीय भाषणात बोलताना ते म्हणाले की, देशाला उभे करण्यामध्ये समाज सुधारक आणि विचारवंतांचा फार मोठा वाटा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी राष्ट्र विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याच्या पाठीमागे स्त्रीशक्तीची मोठी प्रेरणा दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत जिजाऊ मा साहेबांचे मोठे योगदान होते, महात्मा फुलेंच्या सामाजिक समतेच्या लढ्यात सावित्रीबाई फुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अशाच प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज परिवर्तनाच्या आणि राष्ट्र विकासाच्या कार्यात त्याग मूर्ती रमाई आंबेडकरांची मोठी भूमिका राहिली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या आणि राष्ट्र विकासाच्या कार्यात रमाई आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. असे सांगून त्यांनी आजच्या युवक विद्यार्थ्यांनी रमाई आंबेडकरांचा इतिहास जाणून घेण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विभाग प्रमुख प्रा. राकेश रामटेके यांनी केले. यावेळी राज्यशास्त्र तथा लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. उमेश गोगडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. सुकन्या जाधव हिने रमाईच्या जीवनावर स्वागत गीत सादर केले.

यावेळी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे परीक्षक म्हणून रोशन मावळे, डॉ. सुषमा तीनगोटे, मोईन शेख, अजयकुमार महाले, तथागत सुरवाडे यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या महोत्सवाचे समन्वयक डॉ. विजय घोरपडे यांनी केले. तर शंकर यशोध यांनी आभार मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम