महाबळ कॉलनीत घराला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक

बातमी शेअर करा...

महाबळ कॉलनीत घराला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक

वेळीच आल्याने मोठा अनर्थ टळला; फायर ब्रिगेडचे तत्पर कार्य

जळगाव (प्रतिनिधी): महाबळ कॉलनीतील एका डेअरी शेजारील घरात बुधवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत घरातील वायरिंग पूर्णतः जळून खाक झाली असून, वेळीच आग आटोक्यात आल्याने फ्रिज व इतर महत्त्वाचे साहित्य सुरक्षित राहिले.

घराला आग लागल्याचे लक्षात येताच घरमालकाने महाबळ फायर स्टेशनला माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. आग फ्रिजपर्यंत पोहोचण्याआधीच विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे संतोष तायडे, रोहिदास चौधरी, विजय पाटील आणि भगवान पाटील यांनी प्रयत्न केले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम