
महामंडलेश्वर श्रीजनार्दन हरीजी महाराजांना अवतरणदिनी वंदन
महामंडलेश्वर श्रीजनार्दन हरीजी महाराजांना अवतरणदिनी वंदन
भुसावळ – यावल तालुक्यातील निष्कलंक धाम, वढोदे येथे सतपंथ परंपरेचे महामंडलेश्वर, सतपंथरत्न आचार्य श्रीजनार्दन हरीजी महाराज यांच्या अवतरणदिनानिमित्त विविध भक्तिभावपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन ऋषिपंचमीदिनी, गुरूवार दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आले.
अवतरणदिन मंगलप्रसंगी भुसावळ येथील डॉ. जगदीश पाटील यांनी उपस्थित राहून महामंडलेश्वर महाराजांना वंदन करून शुभेच्छा दिल्या व त्यांचे आशीर्वाद घेतले. डॉ. पाटील यांच्यासमवेत अमितकुमार पाटील, संजय ताडेकर, मयूर ताडेकर व आदित्य ताडेकर यांनीही उपस्थित राहून आचार्य महाराजांना वंदन केले. भक्तमंडळींच्या उपस्थितीत दिवसभर सत्संग, भजन, कीर्तन, प्रवचन आणि रक्तदान शिबीरासह सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच तुलसी हेल्थ केअर सेंटरचा लोकार्पण सोहळाही पार पडला. आचार्य श्रीजनार्दन हरीजी महाराज यांनी आपल्या आशीर्वचनांतून श्रद्धाळू जनांना सद्भावना, सेवा आणि संयम या तीन मूल्यांचा जीवनात अवलंब करण्याचे आवाहन केले. त्यांचे मार्गदर्शन भक्तांच्या हृदयाला स्पर्शून गेले. निष्कलंक धाम परिसर भक्तांच्या उपस्थितीने मंगलमय झाला होता.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम