
महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी संजय चौधरी यांची निवड
महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी संजय चौधरी यांची निवड
विविध स्तरातून अभिनंदन
पाडळसरे प्रतिनिधी
दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रेमनगर, जळगाव या विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी झुरखेडा ता धरणगाव निवासी आदर्श उपक्रमशील शिक्षक संजय गोपाल चौधरी यांची पदोन्नतीपर निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल संस्थेचे माजी अध्यक्ष तथा माजी मंत्री सुरेशदादा जैन, संस्थेच्या अध्यक्षा सौ. रत्नाताई जैन, संस्था सदस्य राजेशभाई जैन, सचिव अशोककुमार वस्तीमल खिवसरा, कोषाध्यक्ष डॉ. प्रमोद भागचंद खिवसरा यांनी अभिनंदन केले आहे. संजय चौधरी यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील,खासदार स्मिता वाघ, माजी मंत्री अनिल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार आणि विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम