
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर युवासेनेची टीका
शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद नाहीच! -विराज कावडीय
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर युवासेनेची टीका
“शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद नाहीच! -विराज कावडिया
जळगाव प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पावर युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया (उत्तर महाराष्ट्र) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या अर्थसंकल्पाला “सब कुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी” असे संबोधत सरकारच्या धोरणांवर सवाल उपस्थित केले आहेत.
शेतकऱ्यांसाठी अपेक्षित तरतूद नाही
कावडीया यांनी स्पष्ट केले की, शेतकरी कर्जमुक्तीबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. महाराष्ट्र हा शेतीप्रधान राज्य असूनही सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केली नाही, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांसाठी असलेल्या योजनेचे काय?
राज्यातील महिला सशक्तीकरणासाठी आवश्यक त्या योजना या अर्थसंकल्पात झिरो झाल्याचे ते म्हणाले. लाडकी बहिण योजना आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस धोरण किंवा तरतूद करण्यात आलेली नाही.
एसटीसाठी ‘वाटाण्याच्या अक्षदा’
राज्यातील एसटी सेवा सुधारण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. अर्थसंकल्पात एसटी बससाठी पुरेशी तरतूद नसल्याने प्रवाशांना अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागणार आहे.
औद्योगिक धोरण आणि जिल्ह्यांतील प्रलंबित कामांबाबत नाराजी
नवे औद्योगिक धोरण जाहीर करताना सरकारने उद्योजकांचा विश्वास जिंकण्यास अपयश आल्याची टीका कावडीया यांनी केली. राज्यातील 21,000 प्रलंबित कामे आणि उत्तर महाराष्ट्रातील 710 कामांबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
नदीजोड प्रकल्प आणि पर्यटन क्षेत्रावरही टीका
नदीजोड प्रकल्पासाठी सरकारने असमतोल निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी फक्त सरकार समर्थक भागांमध्येच तरतुदी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
“हे बजेट म्हणजे दिशाहीन धोरण!”
सरकारने सर्वच घटकांचा विचार करून समतोल अर्थसंकल्प मांडला असता तर अधिक चांगले झाले असते. मात्र, सद्यस्थितीत या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी भरीव तरतूद नसल्याची टीका विराज कावडीया यांनी केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम