‘महाराष्ट्रातील जैन लेणी’ आणि ‘परस्परोपग्रहो जीवनाम, जैन विचारधारा’ पुस्तकाचे प्रकाशन

बातमी शेअर करा...

‘महाराष्ट्रातील जैन लेणी’ आणि ‘परस्परोपग्रहो जीवनाम, जैन विचारधारा’ पुस्तकाचे प्रकाशन

श्रवणीय विचार, शाश्वत मूल्ये आणि सहअस्तित्वाचा संदेश प. पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. आधी ठाणा ६ यांची उपस्थिती

जळगाव (प्रतिनिधी) : जैन धर्मातील शाश्वत मूल्यांचा अभ्यास, शिल्पकलेतील तत्त्वज्ञानाचा शोध आणि सांस्कृतिक वारशाचे संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित पुणे येथील लेखिका सरला भिरूड यांच्या ‘महाराष्ट्रातील जैन लेणी’ आणि ‘परस्परोपग्रहो जीवनाम – जैन विचारधारा’ या पुस्तकांचे प्रकाशन आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे राजस्थान प्रवर्तिनि श्रमणी सूर्या प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. आधी ठाणा ६ यांच्या पावन उपस्थितीत ५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या प्रसंगी संघपती सेवादास दलिचंद जैन, नयनतारा बाफना, सुशील बाफना, स्वरूप लुंकड तसेच आत्मोत्कर्ष र्चातुर्मास समिती प्रमुख तारादेवी डाकलिया यांच्या हस्ते ग्रंथांचे लोकार्पण झाले. शहरातील अनेक श्रावक-श्राविका, संशोधक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुस्तक प्रकाशनासंबंधी समन्वय प्रमोद चौधरी आणि नितीन चोपडा यांनी स्थापित केला.

श्रवणीय विचार, शाश्वत मूल्ये आणि सहअस्तित्वाचा संदेश देणारे हे दोन्ही पुस्तक आहेत असे विचार राजस्थान प्रवर्तिनी, श्रमणीसूर्या प. पू. डॉ. सुप्रभाजी म.सा यांनी व्यक्त केले. जैनेत्तर व्यक्तीने अभ्यासपूर्ण संशोधनात्मक पुस्तक लिहिणे हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

समारंभात बोलताना लेखिका सरला भिरूड म्हणाल्या, “महाराष्ट्रातील जैन लेण्या आणि स्थापत्यकलेचा अभ्यास करताना शिल्पांमधील विचारधारा आणि जीवनमूल्ये नव्या दृष्टिकोनातून समोर आली. या लेण्या केवळ दगडातील शिल्प नाहीत, तर त्या जैन तत्त्वज्ञानाचा जिवंत पुरावा आहेत.”

‘महाराष्ट्रातील जैन लेणी’ या १९९ पृष्ठांच्या रंगीत ग्रंथात महाराष्ट्रातील जैन लेण्यांचे स्थान, रचना, शिल्पवैभव आणि त्यातून झळकणारी जैन जीवनदृष्टी यांचा अभ्यास आहे. तर ‘परस्परोपग्रहो जीवनाम – जैन विचारधारा’ या १८४ पृष्ठांच्या पुस्तकात जैन धर्माचा उदय, तत्त्वज्ञान, आचार्यांचे चिंतन आणि सहअस्तित्वाचा विचार सखोलपणे मांडला आहे. दोन्ही पुस्तकं मर्वेन टेक्नॉलॉजीज यांनी प्रकाशित केले असून, हे ग्रंथ जैन तत्त्वज्ञान, इतिहास आणि अध्यात्माचा संगम शोधणाऱ्या वाचकांसाठी मौल्यवान ठरणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव श्री संघाचे महामंत्री सीए अनिल कोठारी यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम