महाराष्ट्रात आणखी 3 दिवस वादळी पावसाचे

बातमी शेअर करा...

महाराष्ट्रात आणखी 3 दिवस वादळी पावसाचे

प्रतिनिधी | पुणे

राज्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आलेल्या पावसाचा मुक्काम ऑक्टोबर महिना संपत आला तरी अजून कायम आहे. सोमवारी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना, जळगाव, अहिल्यानगरसह

अनेक भागात जोरदार पावसाने झोडपून काढले. दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान वाढल्याने तयार झालेल्या मोंथा चक्रीवादळाने हा पाऊस पडत आहे. या वादळाची तीव्रता वाढणार असल्याने महाराष्ट्रात ३० ऑक्टोबरपर्यंत वादळी पाऊस होईल,

असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मंगळवारी रात्री मोंथा वादळ आंध्र किनारपट्टीवरील मछलीपट्टणम ते कलिंगापट्टणमदरम्यान किनारपट्टीला धडकू शकते. तेथे वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमीपर्यंत राहील. यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम