महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाची जळगाव जिल्ह्यात बैठक संपन्न: समाज एकजुटीचा निर्धार

बातमी शेअर करा...

जळगाव: महाराष्ट्र प्रदेश तेली महासंघाच्या जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने रविवार, २७ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जळगाव येथील स्टार पॅलेस हॉटेलमध्ये तेली समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत, समाजाच्या भविष्यातील वाटचालीवर आणि एकजुटीवर सखोल चर्चा करण्यात आली.

जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात संत जगनाडे महाराज यांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी समाजबांधवांशी संवाद साधत, समाजाच्या विकासासाठी आणि परिवर्तनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. या बैठकीला स्थानिक पंचमंडळाचे ३५० सदस्य आणि महासंघाचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी भविष्यात राज्य परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. ही राज्य परिषद समाजाच्या परिवर्तनासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी एक व्यासपीठ ठरेल, असे सांगण्यात आले. जुन्या रूढी आणि परंपरांचे अवलोकन करून, त्यात काळानुरूप बदल घडवण्यावर भर दिला जाईल. आगामी राज्य परिषदेत विविध भागांतील १ लाखांहून अधिक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी महासंघाचे जळगाव जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांचा आणि पंचमंडळ अध्यक्षांचा विजय चौधरी आणि दत्तात्रय तुकाराम चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जळगाव जिल्हाध्यक्ष दत्तात्रय तुकार्रम चौधरी, उपाध्यक्ष विनोद चौधरी, अॅड. वसंत भोलाणे, सेवा आघाडी प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बी. एम. चौधरी, नंदू चौधरी, सिताराम देवरे, अनिल चौधरी, अशोक चौधरी, प्रशांत शिंदे, प्रशांत सुरळकर, शामकांत चौधरी, अशोक नामदेव चौधरी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल रामदास चौधरी पाटील यांनी केले, तर अशोक नामदेव चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम