महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जळगाव जिल्हा स्तरीय मंदिर अधिवेशनाचे आयोजन !

ळगांवचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम यांना श्रीफळ अर्पण !

बातमी शेअर करा...

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जळगाव जिल्हा स्तरीय मंदिर अधिवेशनाचे आयोजन !

जळगांवचे ग्रामदैवत प्रभू श्रीराम यांना श्रीफळ अर्पण !

जळगाव प्रतिनिधि

महाराष्ट्र मंदिर महासंघा, हिंदु जनजागृती समिती आणि मनुदेवी मंदिर संस्थान ट्रस्ट आयोजित महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशन दि. २७ मार्च या दिवशी जळगाव जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र श्री मनुदेवी देवस्थान येथे घेण्यात येणार असून या निमित्ताने मंगळग्रह मंदिर, पद्मालय देवस्थान, ओंकारेश्वर मंदिर ,श्री लक्ष्मीनारायण मंदिर, श्री स्वामीनारायण, पारोळा बालाजी मंदिर, इस्कॉन यांसह जिल्ह्यातील १०० हून अधिक मंदिर विश्वस्तांना निमंत्रण देण्यात आले आहे. ज्या प्रमाणे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी मंदिर संस्कृती, परंपरा जपण्यासाठी अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला आणि समाज साधनेला लावून हिंदु संस्कृती, परंपरा, संस्कार जपले त्याचप्रमाणे आजही त्याची नितांत आवश्यकता असल्याने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी आज सकाळी जुने श्रीराम मंदिरात श्री फळ वाढवण्यात आले. या वेळी मंदिर महासंघाचे जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर,योग वेदांत समितीचे श्री अनिल चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे गजानन तांबट, डॉ चौधरी, रविंद्र हेम्बाडे यांच्यासह हिंदु धर्माभिमानी
उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम