
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा यशस्वीरीत्या पार
84 विद्यार्थी परीक्षेस उपस्थित
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा यशस्वीरीत्या पार
84 विद्यार्थी परीक्षेस उपस्थित
जळगाव महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. ही परीक्षा एम.पी.एड या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होती.
प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची सर्वप्रथम अर्जाची छाननी आणि आयडी कार्ड तपासणी करण्यात आली. त्यानंतर ऑफलाइन पद्धतीने मैदानी परीक्षा (फिल्ड टेस्ट) घेण्यात आली. यात शटल रन, सीट अँड रिच टेस्ट, स्टॅंडिंग ब्रोड जंप, मेडिसिन बॉल थ्रो आणि सीट अप टेस्ट या विविध चाचण्या पार पडल्या. एकूण 109 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, त्यापैकी 84 विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते.
या परीक्षेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे आणि डॉ. बेलोरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपप्राचार्य केतन चौधरी, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. आकाश भिवाल आणि परिक्षक मोहन चौधरी, गोविंदा रायचंदे, विजय चव्हाण, केतन पाटील यांचे सहकार्य लाभले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम