महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२४ चा निकाल जाहीर

बातमी शेअर करा...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२४ चा निकाल जाहीर

जळगाव – महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ परीक्षेचे आयोजन दि. १० नोव्हेंबर, २०२४ रोजी करण्यात आले होते. परीक्षेतील पेपर क्र. । (इ. १ ली ते इ. ५ वी स्तर) व पेपर क्र. ॥ (इ. ६ वी ते इ. ८ वी स्तर) चा अंतिम निकाल दिनांक १४ फेबुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आलेला आहे. सदर परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र त्या त्या जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद / शिक्षण मुंबई (उ/द/प) यांचे कार्यालयाकडे हस्तपोहोच देण्यात येत आहे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांचे कार्यालयात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे वाटप दिनांक ०१ ते ०८नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत केले जाणार आहे. पात्रता धारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या वेबसाईट वरील सूचना वाचून आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह ज्या जिल्हयात परीक्षा दिली तेथील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांचे कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. असे आयुक्त अनुराधा ओक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे – यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम