महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अधिवेशन पाचोऱ्यात

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार अधिवेशन

बातमी शेअर करा...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विभागीय अधिवेशन पाचोऱ्यात

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार अधिवेशन

मान्यवरांना पुरस्कार आणि पत्रकारांना मिळणार मोफत विमा

पाचोरा l प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या खानदेश विभागातर्फे पाचोरा शहरात 29 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता स्वामी लॉन्स

या ठिकाणी पत्रकारांचे विभागीय अधिवेशन संपन्न होत असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभणार आहे.

महाराष्ट्र
महाराष्ट्र

ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते पत्रकारांना मोफत विमा वितरण केले जाणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते पत्रकारांना मोफत ट्रॅक सुट आणि घड्याळाचे वितरण देखील केले जाणार आहे.

या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे यांची देखील उपस्थिती लाभणार असून अधिवेशनाचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे खासदार रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोर पाटील हे स्वागताध्यक्ष आहेत.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून पाचोरा, भडगाव, अंमळनेर, तालुक्यातील एकोणावीस मान्यवरांना विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे.

आमदार किशोर पाटील, शांताराम सोनजी पाटील, प्राचार्या सौ साधना बिडकर, संजय अग्रवाल, संजय कुमावत, सुभाष देसले, संतोष पाटील, किशोर बारवकर, मनोज पाटील, दिलीप पाटील, जयंतराव पाटील,

डॉ. सागर गरुड, डॉ. अनिल शिंदे, अनिकेत सूर्यवंशी, ललिताताई पाटील, के डी पाटील, अशोक पाटील, लखीचंद पाटील, डॉ. अजयसिंह परदेशी, परेश पाटील

या मान्यवरांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी दिली.

पत्रकारांसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाद्वारे दरवर्षी या अधिवेशनाचे आयोजन केले जात असून या अधिवेशनाला सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी आणि पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

जे सभासद असतील त्यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ओळखपत्र आयडी सोबत आणावे व जे नवीन सदस्य फॉर्म भरणार आहे त्यांनी आपल्या दैनिक,साप्ताहिक,

पाक्षिक, मासिक, वृत्तपत्राचे आयडी कार्ड आधार कार्ड व पासपोर्ट फोटो सोबत आणावेत असेही आवाहन आयोजकांनी केले आहेत, सर्व पत्रकारांनी याची नोंद घ्यावी.

हे हि वाचा👇

विष्णापुर येथील आदिवासी आश्रमशाळेचे 14 कोटींच्या वास्तूचे लवकरच लोकार्पण !

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम