महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन

जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

बातमी शेअर करा...

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन
जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

जळगाव- पोलीस स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, दि. 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत शहरातील पोलीस स्केटिंग ग्राऊंड, पोलीस मुख्यालय, नवीन बस स्टॅन्ड समोर, जळगाव येथे शस्त्र, श्वानपथक, पोलीस बँड, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वायरलेस यंत्रणा यांचे प्रदर्शन जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

सदर प्रदर्शनीचे उद्घाटन पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते होणार आहे.

जळगावकर नागरिक तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सदर प्रदर्शनाला भेट देऊन पोलीस हाताळत असलेले यंत्र व शस्त्रांविषयी माहिती जाणून ध्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सदर उपक्रम मागील ९ वर्षांपासून जळगावकर नागरिकांसाठी आयोजित करण्यात येते. हे आयोजनाचे 10 वे वर्ष आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम