महावितरणकडून विद्युत सहायकांची परिमंडलनिहाय निवड यादी जाहीर

बातमी शेअर करा...

 

महावितरणकडून विद्युत सहायकांची परिमंडलनिहाय निवड यादी जाहीर

कागदपत्रांची पडताळणी २० ते २२ ऑगस्टला

जळगाव : महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या ५ हजार ३८१ उमेदवारांची व संबंधित परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये २० ते २२ ऑगस्टदरम्यान करण्यात येणार आहे. या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद परिमंडल कार्यालयांमध्ये मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे तसेच अद्ययावत ओळखपत्राच्या मूळ प्रतीसह स्वतः हजर राहणे अनिवार्य आहे.

महावितरणने जाहिरात क्र.०६/२०२३ अन्वये विद्युत सहायक या पदासाठी २० ते २२ मेदरम्यान ऑनलाइन क्षमता चाचणी घेतली होती. यात निवड झालेल्या उमेदवारांची यादी ३० जुलैला सविस्तर माहिती व सूचनेसह कंपनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर १४ ऑगस्टला निवड यादीतील उमेदवार व त्यांना वर्ग केलेल्या परिमंडलांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

आता येत्या २० ते २२ ऑगस्टदरम्यान विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या ऑनलाइन अर्जामधील नोंदी, अर्हता, कागदपत्रे व प्रमाणपत्रांची छाननी व पडताळणी त्यांना वर्ग केलेल्या संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये होणार आहे. या तीनही दिवशी संबंधित परिमंडलांमध्ये सकाळी १० वाजता मूळ कागदपत्रांची पडताळणी सुरू होईल. नमूद दिवशी काही कारणास्तव पडताळणी पूर्ण झाली नाहीतर दुसऱ्या दिवशी करण्यात येईल. तथापि, सर्व मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांसह संबंधित उमेदवारांनी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहणार नाहीत, त्यांची निवड रद्द समजली जाईल व भविष्यात त्यांच्या कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्युत सहायक पदी निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांची पडताळणी केल्यानंतर जे उमेदवार पात्र होतील त्यांच्या नियुक्तीबाबत संबंधित परिमंडलामध्ये पुढील कार्यवाही करण्यात येईल. याबाबतची सर्व माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम