महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालकांकडून धुळे आणि नंदुरबार मंडलांचा आढावा
‘महावितरण अभय’ योजनेस 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ
महावितरणचे सहव्यवस्थापकीयसंचालकांकडून धुळे आणि नंदुरबार मंडलांचा आढावा
‘महावितरण अभय’ योजनेस 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ
जळगाव I प्रतिनिधी
वेगवेगळ्या कारणाने कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या वीज ग्राहकांची संख्या खान्देशात लक्षणीय आहे. त्यांच्याकडे महावितरणची थकबाकीही मोठी आहे. त्या थकबाकीच्या वसुलीसह खंडित ग्राहकांना पुन्हा नव्याने वीजजोडणी तथा बीलात सवलत देणाऱ्या ‘महावितरण अभय’ योजनेस 31 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन कोकण (कल्याण) परिक्षेत्राचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप जगदाळे यांनी केले.
सहव्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप जगदाळे परिमंडलातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त गुरुवार, दि. 16 जानेवारी 2025 रोजी धुळे येथे झालेल्या बैठकीत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील वीज विषयक विविध कामांचा आढावा त्यांनी घेतला. बैठकीस परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री आय.ए.मुलाणी, कोकण परिक्षेत्राचे वित्त व लेखा विभागाचे महाव्यवस्थापकीय संचालक श्री अनिल बोराटे, धुळेचे अधीक्षक अभियंता श्री निरज वैरागडे, नंदुरबारचे अधीक्षक अभियंता श्री अनिल बोरसे यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते, वित्त व लेखा विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत सहव्यस्थापकीय संचालकांनी नवीन वीज जोडण्या, विना अपघात विद्युत सेवा देण्यासाठीचे दक्षता, प्रधानमंत्री सौरघर योजना, सौर कृषीपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, सौरग्राम योजना आदी कार्यक्रमांचा आढावा घेत सर्व कामांना गती देण्याचे आवाहन केले.
थकबाकीदारांचा कायम खंडित केलेला वीज पुरवठा तपासणी करण्याबरोबरच चालू महिन्याच्या वीजबिलांसह थकबाकीचे वरिष्ठ कार्यालयाने निर्धारित केलेले उद्दीष्ठ वेळेत पूर्ण करण्याचेही निर्देश त्यांनी बैठकीत दिले.
वीज ग्राहकांना सुरळीत आणि अखंडित विद्युत सेवा देण्यासाठी अतिभारीत वाहिन्यांवरील अनधिकृतपणे होणारा वीज वापर नियंत्रणात आणण्याचे आणि वीज चोरी प्रकरणी पोलीसात कारवाया करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. विजेची वितरण व वाणिज्यिक हाणी कमी झाली तरच ग्राहकांना सुरळीत आणि अखंडित सेवा देणे सोयीचे होईल. याकडेही त्यांनी बैठकीतील उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम